0
हेल्मेटसक्ती रद्दण्यासाठी पुणेकर पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांना निवेदन देणार आहेत.

पुणे- हेल्मेटसक्ती विरोधात पुणेकरांनी गुरुवारी (ता.3) 'सविनय कायदेभंग' आंदोलन सुरु केले आहे. हेल्मेटसक्ती कृती विरोधी समिती आणि पुणेकरांनी पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये पुणेकरांनी वेगवेगळ्या स्टाइलच्या पगड्या डोक्यात परिधान करून सहभाग घेतला.

दरम्यान, पुण्यात हेल्मेट सक्तीला विरोध करण्यासाठी अॅड. वाजेद खान बीडकर हे डोक्यात कढाई घालून रस्त्यावर उतरल्याचे दिसले.

बंद करा..बंद करा.. हेल्मेटसक्ती बंद करा, अशा घोषणा देत या मोर्चाला सकाळी सुरूवात झाली. पुणेकरांवर लादलेली हेल्मेटसक्ती रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन घेऊन पुणेकरांनी पत्रकार संघ ते पुणे पोलिस आयुक्तालय असा मोर्चा काढला.

पुणेकरांवर कारवाई
या आंदोलनाला न जुमानता पोलिसांनी हजारो पुणेकरांवर कडक कारवाई केली आहे. 1 जानेवारीपासून ही हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली होती आणि त्याच दिवशी तब्बल 7 हजार 490 पुणेकरांवर पोलिसांकडून कारवाई केली.

या कारवाईतून पोलिसांनी 3 लाखांपेक्षा जास्तीचा दंड वसूल केला. पुढेही ही कारवाई अशीच सुरू राहील, असे पोलिसांनी सांगितले आहे. या कारवाईचा धसका घेत पुणेकरांनी हेल्मेट खरेदीसाठी हेल्मेट दुकानात रांगा लावल्या आहेत.


इतर नियामांचे करतात पालन
हेल्मेटला विरोध नसून, सक्तीला विरोध असल्याचे हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीने म्हटले आहे. पुणेकर इतर सर्व वाहतुकीच्या नियमांचे पालन करतात. त्यामुळे हेल्मेट सक्तीतून सूट मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.


कृती समितीने मांडलेले मुद्दे
- कायद्यात हेल्मेटसक्तीची तरतूद नाही, तरीही सक्ती कशामुळे?
- आयएसआय मार्क असलेल्या हेल्मेटचा आग्रह धरताना त्याची उपलब्धी तपासावी.
- हेल्मेटसक्तीमध्ये पोलिसांचे आर्थिक हित असण्याची शक्यता ?
- शहराचे आठ ही आमदार कृती समितीत होते, मात्र सध्या काहीही भूमिका घेत नाहीत.
Punekar on helmet rule, Pagadi movement done by them

Post a Comment

 
Top