0
सरकारी शाळेच्या होस्टेलमध्ये प्रेग्नेंट झाल्या दोन अल्पवयीन मुली, एकीने दिला बाळाला जन्म.


भुवनेश्वर- मागील काही दिवसांपासून ओडिशामध्ये वेगवेगळ्या सरकारी होस्टेलमध्ये राहणाऱ्या दोन विद्यार्थीनींसह तीन अल्पवयीन विद्यार्थीनी प्रेग्नेंट असल्याच्या घटना समोर आल्या आहे. तर एका अल्पवयीन मुलीने होस्टेलमध्येच बाळाला जन्म दिला आहे. या सर्व घटना ढेंकानाल, कालाहांडीसह जाजपूर जिल्ह्यातील आहे. मागील आठवड्यातही कंधमाल जिल्ह्यातील सरकारी ट्रायबल होस्टेलमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थीनीने बाळाला जन्म दिला होता.


सरकारी हॉस्टेलमध्ये गरोदर झाल्या विद्यार्थीनी
पहिली घटना ढेंकानालच्या सप्तसजया हॉस्टेलची आहे. होस्टेलच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी पोलिसस्टेशनमध्ये एक 14 वर्षाची विद्यार्थीनी गरोदर असल्याने तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी सांगितल्यानुसार, अल्पवयीन विद्यार्थीनी गरोदर असल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तातडीने याप्रकरणी तपास करुन एका 15 वर्षीय विद्यार्थ्याला अटक केली आहे.

दुसरी घटना कालाहांडी जिल्ह्यातील आहे. नरला परिसरातील नवोदय शाळेच्या होस्टेलमध्ये नववीच्या वर्गातील विद्यार्थीनी गरोदर असल्याचे समोर आले आहे. गर्भपात करण्यासाठी तिने गोळ्यांचे सेवन केल्याच्या संशय व्यक्त केला जात आहे. बिहारमध्ये राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

विवाहीत तरुणाने 13 वर्षीय चिमुरडीला केले प्रेग्नेंट
तीसरी घटना कालाहांडी जिल्ह्यातीलच आहे. एका 24 वर्षीय विवाहीत तरुणाने 13 वर्षाच्या चिमुरडीला प्रेग्नेंट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, पीडित चिमुरडी इयत्ता सातवीत शिक्षण घेत आहे. तर आरोपी एक मुलाचा बाप आहे. मुलगी प्रेग्नेंट असल्याचे समजताच तिच्या वडिलांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन आरोपीला अटक केली.

15 वर्षाच्या तरुणीची झाली डिलेवरी
जाजपूर जिल्ह्यात कलिंग नगर भागात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने गुरुवारी एका बाळाला जन्म दिला. पोलिसांनी सांगितल्यानुसार दोघांवर जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असून याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

Shocking news: Teenage girl gives birth and another three found pregnant in Odisha



Post a Comment

 
Top