0
गेल्या काही दिवसांपासून ऋषी कपूर अमेरिकेत उपचार घेत आहेत. नीतू सिंगही त्यांच्यासोबत आहेत. याचदरम्यान नीतू यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि हा फोटो वेगाने व्हायरल होतोय.

ठळक मुद्दे
फोटोत ऋषी कपूर आणि नीतू सिंग लंच करताना दिसत आहेत. याचदरम्यान नीतू यांनी सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. पण हे काय?  ऋषी कपूर आपल्या फोनमध्ये बिझी दिसलेत.

रोज नव-नवे फोटो, पोस्ट शेअर करणाºया नीतू यांची खूप मोठी फॅन फॉलोर्इंग आहे. गेल्या काही दिवसांपासून ऋषी कपूर अमेरिकेत उपचार घेत आहेत. नीतू सिंगही त्यांच्यासोबत आहेत. याचदरम्यान नीतू यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि हा फोटो वेगाने व्हायरल होतोय. आता या फोटोत असे काय खास आहे? तर आहेच. फोटोपेक्षाही या फोटोला नीतू यांनी दिलेले कॅप्शन खास आहे.
फोटोत ऋषी कपूर आणि नीतू सिंग लंच करताना दिसत आहेत. याचदरम्यान नीतू यांनी सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. पण हे काय?  ऋषी कपूर आपल्या फोनमध्ये बिझी दिसलेत. या सेल्फीला नीतू यांनी चांगलेच मजेशीर कॅप्शन देत शेअर केले. ‘लग्नाच्या ३८ वर्षांनंतर तुम्ही पतीसोबत लंच डेटवर जात असाल तर काहीसे असेच होणार. मी येथे सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतेय आणि माझे पती फोनमध्ये बिझी आहेत,’ असे नीतू यांनी लिहिले आहे.

Post a Comment

 
Top