नवी दिल्ली:
भारताने ऑस्ट्रेलियात कसोटीत पहिल्यांदाच मालिका जिंकत इतिहास रचला. ही विजयी घोडदौड वनडेतही कायम राखत मालिका २-१ ने खिशात घातली. या ऐतिहासिक विजयामध्ये तीन आकड्याचा खेळ पाहयला मिळाला. या मालिकेत फलंदाजीत आणि गोलंदाजीत तिहेरी योगायोग झाले आहेत.
रिचर्ड्सनने विराटची केली तीन वेळा शिकार केली
ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज झाय रिचर्ड्सनने वनडे मालिकेतील तिन्ही एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला बाद केले. रिचर्ड्सनने विराटला पहिल्या सामन्यात ३, दुसऱ्या सामन्यात १०४ तर तिसऱ्या सामन्यात ४६ धावांवर बाद केले होते.
रिचर्ड्सनचा बदला भुवनेश्वरने घेतला
ऑस्ट्रेलिया विरूद्ध झालेल्या तीन एकदिवसीय समान्यात ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला भारताच्या एकाच गोलंदाजाने तीन सामन्यात बाद केले. हे असे पहिल्यांदाच घडले आहे. भारतीय संघाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने तीन्ही सामन्यात कर्णधार ॲरोन फिंचला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे भारतीय कर्णधाराला तीन वेळा बाद करणाऱ्या रिचर्ड्सनचा भुवीने बदला घेतला असे म्हणता येईल.
ख्वाजा- शॉनची तिन्ही सामन्यात शानदार अर्धशतकी भागीदरी
ऑस्ट्रेलियाचे फलंदाज उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श या दोघांनी सलग तीन एकदिवसीय सामन्यात अर्धशतकी भागीदरी केली. या मालिकेत अशी कामगिरी करणारी ही पहिलीच जोडी आहे.
धोनीचा ट्रिपल धमाका
गेल्या काही महिन्यांपासून संथ फलंदाजीमुळे टीकेचा धनी झालेल्या माजी कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत सलग तीन अर्धशतके ठोकत टीकाकारांना चपराक दिली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात ५१ धावा, दुसऱ्या सामन्यात नाबाद ५५ धावा तर अखेरच्या तिसऱ्या सामन्यात नाबाद ८३ धावांची खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भुमिका बजावली.

Post a Comment