कोर्टाची प्रक्रिया दीर्घकाळ चालणार आहे, आम्ही कोर्टाच्या निर्णयापर्यंत वाट पाहू शकत नाही, असे विहिंपने म्हटले आहे.
नवी दिल्ली - राम मंदिर निर्माणाबाबत आगामी काळात काय निर्णय घ्यायचा याचा निर्णय धर्मसंसदेत होणार असल्याचे विश्व हिंदु परिषदेने स्पष्ट केले आहे. परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांनी पत्रकार परिषदेत मोदींनी राम मंदिराबाबत जाहीर केलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. आम्ही कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहू शकत नाही. त्यामुळे संसदेत कायदा करून मंदिर निर्माणाचे काम सुरू करावे अशी मागणीही त्यांनी केली.
प्रयागराज येथे कुंभमेळ्याच्या निमित्ताने 31 जानेवारी रोजी धर्मसंसदेचे आयोजन करण्यात येणार आहे. याठिकाणीच राम मंदिर निर्माणाबाबतची पुढील दिसा ठरवली जाणार असल्याचे अलोक कुमार म्हणाले. ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी कोणकोणती पावले उचलायची याचा निर्णय या धर्म संसदेतच होणार असल्याचेही ते म्हणाले.
मंदिराचे प्रकरण 69 वर्षांपासून प्रलंबित आहेत. सुप्रीम कोर्टात तर अजून जजेसचे पीठही तयार करण्यात आलेले नाही. त्यामुळे मोदींसह सत्तेतील इतरांचे मन वळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू असे अलोक कुमार म्हणाले. संसदेत कायदा आणून मंदिर निर्माणाचा आग्रह कायम ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment