0
सोलापूर : 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून चौकीदार चोर म्हणत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे देखील काँग्रेसच्या सुरात सूर मिसळून चौकीदार चोर आहे म्हणत आहे, हे बरोबर नाही. त्यांनी समजून घेण्याची गरज आहे, भाजप हा मवाळ व जहाल अशा दोन्ही भूमिकेत असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सेनेला विनंतीवजा गर्भित इशारा देताना सांगितले. 
अधिक वाचा : रावते यांच्याकडून शिवसेना पदाधिकारी धारेवर

एनडीएसोबत जो येणार नाही त्याला आपटणार, या वक्तव्याचाही दानवे यांनी पुनरुच्चार केला. राममंदिर हा श्रध्देचा विषय असून निवडणुकीचा नाही, न्यायालयाच्या निकालानंतरच राममंदिर बांधले जाईल असे दानवे यांनी स्पष्ट केले. युतीबाबत शिवसेनेला अल्टिमेटम दिलेले नसून उमेदवारी अर्ज भरेपर्यंत युतीच्या चर्चेचा मार्ग खुलाच राहणार आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळा प्रकरणी लवकरच कारवाई होईल,असेही दानवे एका प्रश्‍नाचे उत्तर देताना म्हणाले.

अधिक वाचा : शिवसेना म्हणजे ‘वरून कीर्तन, आतून तमाशा’

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या राज्यातील दौर्‍याच्या अनुषंगाने बुधवारी सोलापुरात आलेले दानवे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, खा. अमर साबळे, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष अशोक निंबर्गी आदी उपस्थित होते.

अधिक वाचा : प्रदेशाध्यक्षांसमोरच भाजप पदाधिकार्‍यांची खदखद उघड
भाजपविरोधी पक्षांनी सुरु केलेल्या आघाड्या म्हणजे त्यांनी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी केलेली लढाई असून अखिलेश-मायावती आघाडीचा काहीही परिणाम होणार नसल्याचे दानवे म्हणाले. समविचारी पक्षांनी एकत्र यावे असा आमचा विचार असल्याने शिवसेनेशी बोलणी सुरू असून लवकरच चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी नमूद केले. 

Post a Comment

 
Top