0
नवी दिल्ली :

भारतीय संघाचा माजी फलंदाज जेकब मार्टिन मृत्यूशी लढत आहे. मार्टिनवर वडोदरा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याने सध्या तो मृत्यूशी झुंज देत आहे. अपघातामध्ये जेकब मार्टिनच्या फुफुस आणि यकृताला इजा झाली आहे. मार्टिनच्या परिवाराने त्याच्या पुढील उपचारासाठी अर्थिक मदतीची मागणी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळेस जेकब मार्टिन यांचे रूग्णालयाचे बिल ११ लाखापर्यंत पोहचले. त्यावेळेस रूग्णालयाने औषधे देण्याची सुविधा बंद केली होती. हे समजताच बीसीसीआय पुढे सरसावली आणि अर्थिक मदत करून त्याच्यावरील उपचार सुरू करण्यात आले.

बीसीसीआयने मार्टिनच्या उपचारासाठी पाच लाख रूपयाची अर्थिक मदत केली आहे. बडोदा क्रिकेट संघानेदेखील मार्टिनच्या उपचारासाठी तीन लाखाची अर्थिक मदत केली आहे. बडोदा क्रिकेट संघाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ज्यावेळी मार्टिनला उपचारासाठी अर्थिक मदत हवी आहे हे समजले त्यावेळी बडोद्याचे समरजीतसिंग गायकवाड यांनी १ लाख रुपये दिले असून पाच लाख रूपये गोळा केले.

बडोदाचे माजी क्रिकेटर जेकब मार्टिनने ९० च्या दशकात भारताच्या संघाकडून १० एकदिवसीय सामने खेळले होते. त्याकाळात त्यांची गणना देशातील अव्वल अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जात होती. इतकेच नव्हे तर, मार्टीन यांनी १०० पेक्षा अधिक फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. निवृत्तीनंतर बडोदा संघाचे प्रशिक्षक पद देखील त्यांनी सांभाळले आहे.

Post a Comment

 
Top