0
मुंबई : 

कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत लवकरच बेस्ट कृती समितीचे नेते व महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्यात बैठक सुरू होणार आहे. या बैठकीत तोडगा न निघाल्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मध्यस्थी करून मार्ग काढणार आहेत. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत संपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. 

ओव्हरहेड गँट्रीज कामामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्ग दोन तास बंद राहणार

महाव्यवस्थापक यांच्या बैठकीत वेतन करार व बेस्ट अर्थसंकल्प पालिकेत विलिनीकरण करण्यावर चर्चा होणार आहे. त्याशिवाय कर्मचार्‍यांना बजावण्यात आलेल्या नोटीस मागे घेण्याची मागणी लावून धरण्यात येणार आहे. दरम्यान आज एकही बस आगाराबाहेर न पडल्यामुळे तिसर्‍या दिवशीही मुंबईकरांचे हाल होत आहेत.

 बेस्ट संपाचा शॉक मुंबईला अन् शिवसेनेलाही

आजही ठिकठिकाणी प्रवाशांनी रिक्षा व टॅक्सीसाठी रांगा लावल्या आहेत. एसटी व खासगी बस सेवा सुरू असल्यामुळे काही प्रवाशांना दिलासा मिळाला. पश्चिम व मध्य रेल्वेने आजही विशेष लोकल सोडल्या आहेत.

Post a comment

 
Top