0
नवी मुंबई  

राज्य पोलिस दलात पोलीस शिपाई पदाची भरती न करता ती पदे 8 जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला आठवडाही उलटत नाही तोच आता गृहविभागाने पोलीस भरतीत सुरुवातीलाच लेखी परिक्षा घेण्याचा निर्णय 18 जानेवारी रोजी घेतला असून हा निर्णय महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम 2019 मध्ये सुधारणा केलेल्या आदेशान्वये घेण्यात आल्याचे आदेश दिले आहेत.

आत्तापर्यंत झालेल्या पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत सुरुवातीला अर्ज केल्यानंतर उमेदवारांना शारिरीक चाचणीसाठी बोलावले जायचे, त्यामध्ये 40 टक्क्यांहून अधिक उमेदवार शारिरीक चाचणीत अपात्र ठरल्याने आपोआपच वगळले जायचे. त्यानंतर उर्वरीत उमेदवारांची लेखी परिक्षा घेतली जात होती. मात्र, आता यामध्ये बदल करत महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम 2011 मधील नियम 4 चे उपखंड (1), (2),(3) सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार आता सुरुवातीलाच 90 मिनिटांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यामुळे आता उमेदवारांना शारिरीक चाचणी पेक्षा लेखी परिक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

Post a Comment

 
Top