0
वर्णभेदी टिप्पणी केल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पाकचा कणर्धार सर्फराज अहमदवर चार सामन्याची बंदी घातली आहे. सर्फराजने दुसऱ्या एकदिवसी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या अँडील फेलूकव्हायोवर वर्णभेदी टिप्पणी केली होती. त्याचे हे वक्तव्य स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेनंतर त्याच्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी क्रिकेट चाहत्यातून होऊ लागली.
आपली चुक लक्षात आल्यानंतर सर्फराजने माफी मागीतली होती आणि आफ्रिकेच्या अँडील फेलूकव्हायोने त्याला माफदेखील केले होते. मात्र, या प्रकरणाची आयसीसीने गंभीर दखल घेत अहमदवर चार सामन्याची बंदी घातली आहे. आयसीसीने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणाऱ्या अंतिम दोन एकदिवसीय सामन्यात आणि टी-20 मालिकेतील सुरूवातीच्या दोन सामन्यात खेळण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे चौथ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक करण्यासाठी सर्फराजच्या बदल्यात  शोएब मलिक उतरला होता.

सर्फराजने दुसऱ्या एकदिवसी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या अँडील फेलूकव्हायो फेलूकव्हायो धावपट्टीवर फलंदाजी करत असताना ''ए काळ्या, तुझ्या आईला तू कुठे बसवून आला आहेस? आईला काय प्रार्थना करायला सांगितली आहेस?”, असे वक्तव्य केले होते. 

Post a comment

 
Top