ठाणे
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमाच्या मुंबईत झालेल्या स्पेशल स्क्रीनिंगच्या वेळी घडलेल्या मानपानाच्या नाट्याचे पडसाद आज ठाण्यातही उमटले.
अभिजित पानसे यांच्या कुटुंबियांना यावेळी बसायला जागा न मिळाल्याने आज ठाण्यातील मनसेच्या संतप्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाण्यातील वंदना सिनेमाच्या बाहेर लावलेल्या चित्रपटाच्या फलकावरील खासदार संजय राऊत यांचे नाव खोडले आहे. याशिवाय या अपमानाचा बदल घेण्यासाठी या सनेमागृहातील सर्व तिकीट मनसेचे पदाधिकारी महेश कदम यांनी विकत घेतली आहेत. उद्या शुक्रवारी साडेबाराला होणाऱ्या या शो साठी अभिजित पानसे यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित राहणार असल्याची माहिती महेश कदम यांनी दिली आहे. त्यामुळे भविष्यात या मानाअपमान नाट्यवावरून हा वाद अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत.
नेमका वाद काय आहे?
ठाकरे’ सिनेमाचं मुंबईत स्पेशल स्क्रीनिंग झालं. या स्पेशल स्क्रीनिंगसाठी दिग्गज नेते आणि इतर मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेलं. पण स्वतः दिग्दर्शकच नाराज झाल्यामुळे कुजबुज पाहायला मिळाली. अभिजित पानसे यांना सर्वात पुढची सीट दिल्यामुळे ते नाराज झाल्याचे बोलले जात आहे. संजय राऊत यांनी पानसेंची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. पण यात त्यांना यश आलं नाही. पानसे कुटुंबासह घरी निघून गेले. अभिजित पानसे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे, तर संजय राऊत यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.

Post a Comment