मुंबई :
सध्या हिंदी वेबसीरिजची चलती असताना त्यांना टक्कर द्यायला आलीय मराठी वेबसीरिज 'स्त्रीलिंग पुलिंग'. या वेबसीरिजची चर्चाच चर्चा सुरू आहे. कारण, प्रेक्षकांनी या वेबसीरिजवर अक्षरश: उड्या घेतल्या आहेत. १६ डिसेंबर, २०१८ ला या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. शुद्धदेसी मराठीच्या या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांना त्याची उत्सुकता लागून राहिली होती.
या वेबसीरिजमध्ये सर्व तरुण कलाकार आहेत. विशेष म्हणजे छोट्या पडद्यावरील 'लागीरं झालं जी' मालिकेतून घराघरांत पोहोचलेला हा 'विक्या' अर्थातच निखिल चव्हाण या वेबसीरिजमध्ये आहे. 'सचिन' उर्फ 'सच्या'च्या भूमिकेत तो दिसणार आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक हिंदी वेबसीरिजनी आपले बस्तान बसवले आहे. त्यात एक मराठी वेबसीरिज चर्चेचा विषय बनला आहे. 'स्त्रीलिंग पुलिंग' ही या शुद्धदेसी मराठीचा पहिला एपिसोड रिलीज करण्यात आला. त्यानंतर पुढे काय होणार, याची उत्सुकता लागून राहिली. फेसबुक आणि यु-टयूबवर या सीरिजचा दुसरा एपिसोड रिलीज करण्यात आला आहे.
१५ दिवसांत ३० लाख लोकांनी पाहिली सीरिज
वेबसीरिजचा १६ डिसेंबरला ट्रेलर रिलीज करण्यात आल्यानंतर १५ दिवसांत हा ट्रेलर ३० लाख लोकांनी पाहिला. वेबसीरिजचा पहिला एपिसोड ३ जानेवारीला रिलीज करण्यात आला. फक्त ६ दिवसांत ८ लाख लोकांनी हा एपिसोड पाहिला. या सीरिजमध्ये सहा एपिसोड आहेत. निखिल चव्हाण, भाग्यश्री न्हालवे, सायली पाटील, आरती मोरे, ऋतुराज शिंदे या यंग कलाकारांच्या मुख्य भूमिका वेबसीरिजमध्ये आहेत.
अशी आहे कथा
पल्लवी एक साधी-सरळ मुलगी आहे. तिच्या जीवनात अचानक वादळ येते. आणि ती हादरुन जाते. याला सामोरे जाताना तिला काय करावे, हे सुचत नाही. तिच्या दोन बेस्ड फ्रेंड प्रिया आणि अर्चना यांना ती भेटते. पल्लवी आपल्या मैत्रीणींना सर्वकाही सांगते. त्यानंतर प्रिया आणि अर्चना दोघीही पल्लवीला मदत करायचा निर्णय घेतात. पुढील कथा काय आहे? हे पाहण्यासाठी तुम्हाला 'स्त्रीलिंग-पुलिंग'चा एपिशसोड पाहायला लागणार आहे.
'स्त्रीलिंग-पुलिंग' वेबसीरिजचे दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले आहे. याआधी समीर यांनी 'चौर्य', 'यंटम' आणि 'वाघेऱ्या' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Post a Comment