0
पुणे :

यवतमाळ येथे शुक्रवारपासून ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाला सुरुवात होत आहे. संमेलनाच्या उद्घाटनाच्या निमंत्रणापासूनच हे साहित्‍य संमेलन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अनेक साहित्‍यिक, विचारवंत, प्रकाशकांनी यंदाच्या साहित्‍य संमेलनावर बहिष्‍काराची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संमेलनाच्या उद्घाटनासाठी उपस्‍थित राहणार नाहीत. 

उद्घाटन कार्यक्रमाला सरकारतर्फे देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. येत्या रविवारी होणारा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे. विनोद तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली.

यावेळी विनोद तावडे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटन सोहळ्याला मुख्यमंत्र्यांऐवजी मी उपस्थित राहणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे रविवारी होणाऱ्या समारोपास उपस्थितीत राहणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, शुक्रवारी आणि शनिवारी दिल्‍लीत भाजपच्या राष्‍ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह सर्व राज्‍याचे मुख्यमंत्री उपस्‍थित राहणार आहेत. त्‍यामुळे देवेंद्र फडणवीस यांना या बैठकीस जावे लागणार असल्‍याचे ते संमेलनाच्या उद्‌घाटन सोहळ्याला उपस्‍थित राहणार नाहीत.  

Post a Comment

 
Top