0
याप्रकरणी नऊ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड : देगलूर तालुक्यात हद्दीवर असलेल्या नागराळ येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर रविवारी सायंकाळी एलसीबीच्या पथकाने धाड टाकली. पोलिसांनी ६ जणांना अटक केली तर ३ जण पळून जाण्यात यशस्वी झाले. 

देगलूर शहर व परिसरात अवैध धंद्यांनी उच्छाद मांडले आहे. नागरिकांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रारीचा पाढा मांडला होता. याची दखल घेत शहरापासून १५ किलोमीटरवर असलेल्या नागराळ येथे रविवारी सायंकाळी  पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकली.  यावेळी ५५ हजार ५६० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य काही मोटरसायकली आढळून आल्या. 

याप्रकरणी नऊ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सहा जणांना अटक करण्यात आली असून तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक कल्याण मेहरकर यांनी दिली.Six accused in the police raid in Deglur taluka | देगलूर तालुक्यात जुगार अड्ड्यावरील धाडीत सहा जण अटकेत 

Post a Comment

 
Top