0


नवी दिल्ली :
देशाचे माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रणव मुखर्जी यांच्याबरोबरच संघ विचारक नानाजी देशमुख आणि आसाममधील प्रख्यात गायक भुपेन हजारिका यांनाही मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. 
देशाच्या इतिहासात २० वर्षांनंतर प्रथमच एकाचवेळी तिघांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक नानाजी देशमुख आणि गायक भूपेन हजारिका यांना भारतरत्न जाहीर झाला. नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना मरणोत्तर सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला. 
यापूर्वी १९९९ मध्ये सतारवादक पंडित रविशंकर, अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन आणि स्वातंत्र्यसेनानी गोपीनाथ बोरदोलाई यांना एकाचवेळी तिघांना  भारतरत्न पुरस्कारासाठी निवडण्यात आले होते. २०१५ मध्ये सुद्धा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि स्वातत्र्यसेनानी मदन मोहन मालवीय यांना एकाचवेळी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

Post a comment

 
Top