0
नवी दिल्‍ली : 

प्रिया प्रकाश वारियरने 'श्रीदेवी बंगलो' या चित्रपटातून बॉलिवूडमध्‍ये पदार्पण केले. या चित्रपटाची सध्‍या चर्चा होतेय. 'श्रीदेवी बंगलो'चा ट्रेलर रिलीज झाला असून सोशल मीडियावर ट्रेलर व्‍हायरल होत आहे. चित्रपटाच्‍या नावावरून असे वाटते की, हा चित्रपट श्रीदेवी यांच्‍या आयुष्‍यावर आधारित आहे. चित्रपट रिलीज होण्‍याआधीच हा चित्रपट वादात सापडला आहे. हा ट्रेलर बोनी कपूर यांनी पाहिल्‍यानंतर चित्रपट निर्मात्‍यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

अधिक वाचा :  प्रियाचा बॉलिवूड डेब्‍यू, ट्रेलर रिलीज होताच ट्रोल (Video)

चित्रपटात कुठेही श्रीदेवी यांना क्रेडिट देण्‍यात आलेले नाही. तसेच एका सीनमध्‍ये बाथटबमध्‍ये त्‍या अभिनेत्रीचा मृतदेह सापडतो, असे दाखवण्‍यात आले आहे. श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी चित्रपट दिग्‍दर्शक डायरेक्टर प्रशांत मंबुली यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ही माहिती स्‍वत: मंबुली यांनी दिली आहे. त्‍यांनी म्‍हटलयं की, 'आम्‍हाला गेल्‍या आठवड्‍यात बोनी कपूर यांच्‍याकडून कायदेशीर नोटीस मिळाली आहे. हा एक सस्पेंस थ्रीलर चित्रपट आहे. मी बोनी कपूर यांना सांगितले होते की, श्रीदेवी एक कॉमन नाव आहे. चित्रपटात प्रियादेखील एक अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे. आम्‍ही पाहून घेऊ.'

हा चित्रपट श्रीदेवी यांच्‍या आयुष्‍यापर आधारित नाही, असे चित्रपटाचे दिग्‍दर्शक आणि प्रिया वारियरने म्‍हटले आहे. एका वेबसाईटने दिलेल्‍या माहितीनुसार, 'प्रियाच्‍या वडिलांनी कायदेशीर नोटीसविषयी बोलण्‍याचे टाळले. ते म्‍हणाले, 'हा दिग्‍दर्शक आणि प्रोड्यूसर यांचा विषय आहे.'

Post a Comment

 
Top