0
नवी दिल्ली :

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि सलामीवीर लोकेश राहुल यांना महिलांवर केलेली बेताल वक्तव्ये चांगलीच भोवण्याची शक्यता आहे. क्रिकेट प्रशासकीय समिती पमुख विनोद राय यांनी पांड्या आणि राहुलवर दोन सामन्यांची बंदी घालण्याची शिफारस केली आहे. तसेच यावर आता कर्णधार विराट कोहलीनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारताचा क्रिकेट संघ आणि जबाबदार क्रिकेटपटू म्हणून आम्ही या दोन्ही क्रिकेटपटूंनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करत नाही. त्यांनी केलेले वक्तव्य ही त्यांची वैयक्तिक आहेत. संघाचा त्याच्याशी कसलाही संबंध नाही. या दोघांनी केलेल्‍या वक्‍तव्या प्रकरणी बीसीसीआय काय निर्णय घेते, याची आम्ही वाट पाहत आहोत. अशी प्रतिक्रिया विराटने दिली आहे.

Post a Comment

 
Top