प्रतापगड :
महाबळेश्वर येथील लॉडविक पॉईंट ते किल्ले प्रतापगड असा सुमारे 6 किलोमीटर लांबीचा देशातील सर्वात मोठा रोप-वे लवकरच साकार होणार असून या रोप-वेमुळे पर्यटनाचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे.
महाबळेश्वरला दरवर्षी सरासरी 18 लाख पर्यटक भेट देतात. त्यापैकी किल्ले प्रतापगडला साधारण 5 टक्केच पर्यटक भेट देत असतात. किल्ले प्रतापगडला जाण्यासाठी 20 किलोमीटरचा नागमोडी आंबेनळी घाट पार करावा लागत असल्यामुळे बरेचशे पर्यटक घाटाने प्रवास करण्याचे टाळतात. त्यामुळे प्रतापगड पाहणार्या पर्यटकांची संख्या तशी कमीच. पर्यटकवाढीचा विचार करून ‘महाप्रताप’ राज्यमार्ग या नावाने हा पर्यटकांना आकर्षित करणारा नवीन महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.
या प्रकल्पासाठी लागणार्या सर्व मान्यता घेण्यात आल्या असून हा प्रकल्प लवकरच साकारणार आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा हा महाबळेश्वर येथील लॉडविक पॉईंट येथे असून तो जावली या गावामध्ये उतरणार आहे. त्या ठिकाणी पर्यटकांसाठी फूड मॉल व 15 मिनिटांचे शिवचरित्र दाखवण्यात येणार आहे, त्याचबरोबर बटरफ्लाय गार्डन अशा विविध गोष्टी साकारल्या जाणार आहेत. दुसरा टप्पा हा जावली गावातून थेट किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला असेल. पायथ्याला उतरल्यावर तेथून किल्ल्यावर मात्र पायी जावे लागणार आहे.
या प्रकल्पासाठी लागणारी जमीन जावली गावामध्ये खरेदी करण्यात आली आहे. हा रोप -वे जगातील दुसरा सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे. या रोप-वेमुळे किल्ले प्रतापगडला भेट देणार्यांची संख्या दुपटीने वाढणार आहे. स्थनिकांसाठी प्रामुख्याने शालेय मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्याकरिता ही सेवा पूर्णपणे मोफत असणार आहे.

Post a Comment