0
भारतासाठी मस्ट विन असणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ॲडलेडच्या उष्ण वातावरणात हा निर्णय अपेक्षितच होता. पण, कांगारुंच्या बॅटिंग पिचवर मोठी धावसंख्या उभारण्याच्या मनसुब्यांना भुवनेश्वर आणि शामी या जलदगती जोडीने सुरुंग लावला. या दोघांनीही दोन्ही सलामीवीरांना पाठोपाठ तंबूत पाठवले.   भुवनेश्वरने कर्णधार फिंचचा ६ धावांवर त्रिफळा उडवत पहिला धक्का दिला. तर शामीने ॲलेक्स केरीला धवनकरवी झेलबाद करत कांगारुंना दुसरा धक्का दिला. यामुळे कांगारुंची ८ षटकात २ बाद २६ धावा अशी अवस्था झाली.


दोन्ही सलामीवीर स्वस्तात परतल्यानंतर आलेल्या शॉन मार्श आणि उस्मान ख्वाजा या दोन डावखुऱ्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी रचली. पण ही भागिदारी फुटली ती जडेजाच्या डायरेक्ट हीटने जडेजाने ख्वाजाचा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न हाणून पाडत त्याला २१ धावांवर रनआऊट केले. यानंतर आलेल्या ह

*ऑस्ट्रेलियाच्या १९ षटकात ३ बाद ८३ धावा 

*ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज बाद; जडेजाच्या डायरेक्ट हीटने ख्वाजा रन आऊट 

*ऑस्ट्रेयिलाच्या १६ षटकात २ बाद ७२ धावा 

*ऑस्ट्रेलियाच्या ११ षटकात २ बाद ४१ धावा

*ऑस्ट्रेलियाच्या ७.४ षटकांत २ बाद २६ धावा

*कांगारुंचा दुसरा सलामीवीरही माघारी; शामीने कॅरीला १८ धावांवर बाद केले

*ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का; फिंच ६ धावांवर बाद

*ऑस्ट्रेलियाच्या २ षटकात बिनबाद ८ धावा  

*भारताचा संघात एक बदल; खलीलच्या जागी मोहम्मद सिराजचे पदार्पण 

*नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय 

Post a Comment

 
Top