सोलापूर :
करमाळा तालुक्यातील वांगी नं. 1 या गावात कोपर्डी हत्याकांडाची आठवण ताजी करणारी भयानक घटना उघडकीस आली आहे. शौचास गेलेल्या 14 वर्षांच्या मुलीला नराधमाने उसाच्या फडात ओढत नेत पाशवी बलात्कार केला. त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या करण्याचाही प्रयत्न केला. बेशुद्ध पडलेली मुलगी मृत पावल्याचे समजून नराधम घटनास्थळावरून पसार झाला.
शेतात काम करणार्या महिलांसह तिच्या मेव्हण्याने रक्तबंबाळ अवस्थेतील मुलीला तातडीने सोलापूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या मुलीची प्रकृती चिंताजनक असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. करमाळा तालुक्यातील वांगी नं. 1 या गावात राहणारी 14 वर्षीय मुलगी ही आई-वडील नसल्याने बहिणीच्या घरी आश्रयास आहे. तिच्या बहिणीचा पती आणि घरचे लोक हे एका शेतमालकाकडे सालगडी म्हणून काम करतात. त्या मुलीच्या बहिणीला एक बाळ आहे. ते बाळ सांभाळणे आणि बहिणीला घरात मदत करणे अशी कामे ती मुलगी करत असते. 7 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तिने बाळ तिच्या मेव्हण्याकडे दिले आणि शौचास जाऊन येते असे सांगून ती घराबाहेर पडली. त्यानंतर मुलगी अजून कशी आली नाही म्हणून त्या मुलीची बहीण, मेव्हणे हे तिचा शोध घेऊ लागले. दुपारी 12 च्या सुमारास त्या मुलीच्या मेव्हण्याला ती मुलगी ज्या शेतात ते सालगडी म्हणून काम करतात त्या शेतातील उसाच्या फडात विवस्त्र व रक्तबंबाळ अवस्थेत दिसली. घाबरलेल्या मेव्हण्याने ही माहिती शेतात काम करणार्या महिलांना सांगितली. शेतात काम करणार्या महिला संबंधित मेव्हण्यासह घटनास्थळी जाऊ लागल्या असता संबंधित नराधम उसाच्या फडातून पळून गेला. घटनास्थळी 10 ते 12 ऊस तुटून पडलेले दिसले, तिच्या डोक्यातून आणि शरीरातून रक्त भरपूर गेले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीला तेथील महिलांसह मेव्हण्याने तत्काळ करमाळा सरकारी रुग्णालयात नेले. तेथे त्या मुलीवर प्राथमिक उपचार करून व ही घटना करमाळा पोलिसांना कळवून त्या मुलीची बहीण, मेव्हणे, त्यांचा छोटा मुलगा आणि त्या मुलीचा मामा हे सर्वजण सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पोहोचले. पीडित मुलीला शासकीय रुग्णालयातील ओपीडी या तातडीच्या विभागात उपचारास दाखल केले. ही मुलगी अत्यवस्थ असून मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करमाळा पोलिस ठाण्यात करण्याची प्रक्रीया सुरू होती.
मुलीवर बलात्कारानंतर खुनाचा प्रयत्न
या घटनेबाबत बोलताना त्या पीडित मुलीचे मेव्हणे म्हणाले, सोमवारी सकाळी 11 वाजता माझ्या मेव्हणीने माझ्या लहान मुलाला माझ्याकडे दिले आणि ती शौचास जाऊन येते असे सांगून गेली. दुपारी 12 वाजले तरी ती कशी आली नाही म्हणून आम्ही तिचा शोध घेतला. तेव्हा माझी मेव्हणी ही उसाच्या फडात विवस्त्र आणि रक्तबंबाळ अवस्थेत दिसली. त्यानंतर आम्ही सर्वांनी तिला दवाखान्यात नेले. बलात्कारानंतर तिचा खुनाचा प्रयत्न झाला असावा, अशी शक्यता पीडितेच्या मेव्हण्याने व्यक्त केली आहे.

Post a Comment