0
जनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक
हिंदुस्थानाच्या हृदयावर राज्य करणाऱ्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित शिवसेना नेते खासदार संजय राऊत निर्मित ‘ठाकरे’ सिनेमाची चर्चा सध्या जोरात आहे. 25 जानेवारी रोजी देशभरात प्रदर्शित होणाऱ्या ठाकरे सिनेमाचा टीझर आणि ट्रेलर सुपरहिट ठरले. मराठी सिमेनाचा सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेमकरणाऱ्या जनतेला त्यांचाच आवाज ऐकायचा होता. अखेर ‘ठाकरे’च्या टीमने अवघ्या 10 दिवसांत जनतेच्या मनातील तो खणखणीत आवाज सिनेमात शिवसेनाप्रमुखांची भूमिका वठवणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीला दिला आहे.

पाहा अंगावर रोमांच उभा करणारा, मनात चैतन्याचे असंख्य स्फोट घडवून आणणार, लाखोंना प्रेरित करणारा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील ‘ठाकरे’ सिनेमाचा खणखणीत डायलॉग…
thackeray-music-launch

Post a Comment

 
Top