0
मुंबई : 

विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सलग चौथ्या दिवशी शुक्रवारी (दि.११) सुरूच आहे. बेस्टच्या वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाला विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. ते देखील आता संपात सहभागी होणार आहेत.

 उद्धवशिष्टाई निष्फळ; बेस्ट संप चिघळला!

दरम्यान, गुरुवारी (दि.१०) उशिरापर्यंत महापौर बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्‍त अजोय मेहता यांच्यासोबत चाललेली बैठक निष्फळ ठरली आणि बेस्ट कामगारांचा संप सुरूच राहणार असल्याचे कामागार नेते शशांक राव यांनी जाहीर केले. परिणामी, मुंबईकरांची वाहतूक कोंडी सुटण्याची कोणतीही आशा नाही. बेस्ट संपाने आता चौथ्या दिवसांत पदार्पण केले असून, सर्वत्र प्रवाशांचे हाल सुरू आहेत.

संपावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी सकाळी बेस्ट महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी कुलाब्यातील बेस्ट भवनमध्ये कृती समितीच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. पण या चर्चेत तोडगा न निघाल्यामुळे संप सुरूच ठेवण्यात आला. 

Post a Comment

 
Top