0
उंब्रज / चाफळ (सातारा) :

काही दिवसापूर्वी बेलावडे हवेली येथे विहिरीत बिबट्या पडल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी सकाळी आणखी एक घटना घडली. खालकरवाडी (ता. कराड) येथे हा प्रकार घडला असून सुमारे दीड वर्षाचे बिबट्याची पिल्लू विहिरीत पडले आहे.खालकरवाडी येथील पांडुरंग तुकाराम शिंदे यांच्या विहिरीत हे पिल्लू पडले आहे. गावातीलच प्रदीप गाडे नावाची व्यक्ती शिंदे यांची विहीर असलेल्या पट्टी नावाच्या शिवारात गेली होती. त्यावेळी हा प्रकार समोर आला. पाणी पिण्यासाठी अथवा एखाद्या पक्षाच्या शोधार्थ हे पिल्लू आले असावे आणि विहिरीत पडले असावे असा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तवला आहे.

Post a Comment

 
Top