0
नवी दिल्‍ली :

प्रियांका गांधी वधेरा यांच्‍या राजकारणातील प्रवेशावरुन दररोज नवनवीन तर्क व टीकात्मक प्रतिक्रिया समोर येत आहेत. सुंदर चेहर्‍यावर मते मिळत नसतात. प्रियांका खूप सुंदर आहेत मात्र त्‍यांना राजकारणाची माहिती नाही, असे वादग्रस्‍त वक्‍तव्‍य बिहारचे भाजप मंत्री विनोद नारायण झा यांनी केले होते. आता भाजपचे बिहारमधील मंत्री प्रमोद कुमार यांनी, प्रियांका गांधी वधेरा अजून 'बच्ची' (लहान मुलगी) आहेत, असे वक्तव्य केले आहे.


काँग्रेसला जर पंतप्रधान मोदींच्या बरोबर स्पर्धा करायची आहे, तर सोनिया गांधी यांना निवडणूक मैदानात उतरायला हवे, असे आव्हान बिहारचे पर्यटनमंत्री प्रमोद कुमार यांनी दिले आहे. सोनिया गांधी आणि नरेंद्र मोदी हे समवयस्क आहेत. त्या तुलनेत प्रियांका खूप लहान आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. 

लोकसभा निवडणूक तोंडावर असताना प्रियांका गांधी- वधेरा यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. आता प्रियांका गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी येथून निवडणूक रिंगणात उतरवले जाणार असल्याची अटकळ बांधली जात आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपकडून प्रियांका यांच्या राजकीय प्रवेशाबाबत टीकात्मक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

Post a comment

 
Top