0
मुंबई  : 


बेस्टचा संप मोडीत काढण्यासाठी प्रशासनाने रणनिती आखली आहे. कामगारांना मेस्मा अंतर्गत नोटीसच नाही तर आता मुंबईकरांच्या सेवेला 2 हजार खाजगी व स्कूल बस उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारपासून या बस चालवण्याचे आश्र्वासन स्कूल बस ओनर्स असोसिएशन व मुंबई बस मालक संघटना यांनी दिले आहे.

बेस्ट संपामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत. रोज रिक्षा व टॅक्सीने प्रवास करणे सामान्य मुंबईकरांना शक्य नाही. त्यामुळे आता मुंबईकरांचे हित डोळ्यासमोर ठेवून संप मोडीत काढण्याच्या निर्णयापर्यत बेस्ट प्रशासनान पोहचले आहे. विशेष म्हणजे याला सत्ताधारी शिवसेनेचा पाठींबा असल्याचे बोलले जात आहे. कामगारांनी शिवसेनेची साथ सोडल्यामुळे त्याचा बदला म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

मुंबईतील स्कूल बस व खाजगी बस संघटनांशी चर्चा करून मुंबईत कमी अंतरामध्ये बस चालवण्यात येणार आहेत. 10 किमी अंतरासाठी बेस्ट बसच्या रूटनुसार या बस धावणार आहेत. यासाठी अवघे 20 रूपये भाडे आकारण्यात येणार आहे. मात्र ज्येष्ठ नागरीक, अपंग प्रवाशांना मोफत बस प्रवास उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


Post a comment

 
Top