0
या परिस्थितीला वितरकच सर्वस्वी जबाबदार, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा आरोप

नाशिक- रणवीर सिंह अभिनीत 'सिम्बा' चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर १०० काेटींची कमाई केली आहेे. देशभरात सर्वच चित्रपटगृहात या सिम्बा सुरू असल्याने महान साहित्यिक पु.ल. देशपांडेंच्या आयुष्यावरील 'भाई' चित्रपट अडचणीत सापडला आहे. या परिस्थितीला वितरक जबाबदार असल्याचा आरोप दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी 'दिव्य मराठी'च्या भेटी प्रसंगी सांगितले.

महाराष्ट्राचे लाडके पु. ल. देशपांडे यांचे आत्मचरित्र 'व्यक्ती की वल्ली-भाई' या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी रसिकांना बघता येणार आहे. हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित हाेत आहे. या निमित्ताने मांजरेकर, अभिनेता सागर देशमुख, व्हायाकाॅम १८ चे निखिल साने यांनी नाशिकच्या 'दिव्य मराठी' कार्यालयाला भेट दिली. अनेक ठिकाणी या चित्रपटासाठी चित्रपटगृह मिळत नसल्याने पुन्हा मराठी चित्रपटांच्या थिएटरचा प्रश्न चर्चेला आला. इतर वेळीही मराठी चित्रपटांना प्राइम टाइम मिळत नाही. ताे मुद्दा असताना आता भाईसारख्या महत्त्वाच्या चित्रपटाला थिएटरच मिळत नसल्याने नाराजी व्यक्त हाेत आहे. याबद्दल मांजरेकर म्हणाले की, त्यांचा चित्रपट चालला आहे हे चांगलेच आहे. पण, म्हणून दुसरा चित्रपट लागूच द्यायचा नाही हे चुकीचे आहे. सिम्बा प्रदर्शित होऊन आता एक आठवडा झाला. तुम्ही एक आठवडा कमावले आहे. लक्ष्मीनारायण थिएटरमध्ये आमची माणसे चित्रपट पाहायला गेली होती. तेव्हा त्यात सिम्बा पाहायला फक्त ७० लाेकच होती. म्हणजे तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत. दिवसभराचे सगळेच शाे तुम्ही अडवून बसणार का? अन्य चित्रपटांना किमान दाेन शाे तरी द्यायला हवे, असेही मांजरेकर या वेळी म्हणाले.

वितरकांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी
ही अडवणूक वितरक करतात. एखादा चित्रपट चालत असला की ते पुढल्या चित्रपटासाठी अक्षरश: ब्लॅकमेल करतात. हे सामंजस्याने घेतले तर 'भाई'साठीच नव्हे तर अन्य चित्रपटांनाही जागा मिळेल. पण, अडवणूकच करायची ठरवल्यावर आपण काय करणार? मी यासंदर्भात सांस्कृतिकमंत्री विनाेद तावडे यांच्याशी बाेललाे आहे. - महेश मांजरेकर, दिग्दर्शक
Marathi Film Bhai Vyakti Ki Valli Not Getting Single Screen Theater In Mumbai Pune

Post a Comment

 
Top