0
पारोळा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दोन गटात झालेल्या वादातून हाणामारीची घटना मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली़ मंगळवारचा बाजार असल्याने अनेकांची धावपळ झाली़ घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने दाखल झाले असून बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे़ बाजार समितीच्या आवारात तणावपुर्ण शांतता आहे़ घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, आझादनगर पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे़ हाणामारीत एकास दुखापत झाली आहे़
There are two groups in the Dhule market committee | धुळ्यातील बाजार समितीत दोन गट भिडले

Post a Comment

 
Top