0
केबल आणि डीटीएच वापरकर्त्यांना केवळ १३० रुपयांमध्ये १०० मोफत किंव शुल्क लागू असलेल्या वाहिन्यांचा  आनंद घेता येणार आहे.  १३० रुपयांच्या पॅकमध्ये जीएसटी लागू करून १५३.४० रुपये होतात.

 येत्या ३१ जानेवारीपर्यंत ग्राहकांना आपल्या पसंतीच्या वाहिन्या पसंत करणे आवश्यक आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून नवे नियम लागू होणार असल्याचे ट्रायकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या केबलसाठी जवळपास ४५० रपयापर्यंत भाडे आकारले जाते. यामध्ये ४५० हून अधिक चॅनेल आहेत. आता ग्राहकांना १३० रुपयांमध्ये (जीएसटीसह १५३.४० पैसे) १०० चॅनेल्स पाहायला मिळणार आहेत. चॅनेल दर कमीत कमी  ५० पैसे तर जास्तीत जास्त १९ रुपये असेल.

ट्रायने दिलेल्या माहितीनुसार १०० वाहिन्यांमध्ये एचडी वाहिन्या असणार नाहीत, पण काही वाहिन्यांनी एक एचडी वाहिनी आणि दोन साध्या वाहिन्या असतील असे म्हटले आहे.



Post a Comment

 
Top