0
पीडित मुलगी 70 टक्के भाजली आहे. हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरु असून जीवन-मृत्यू असा तिचा संघर्ष सुरु आहे

मुंबई- पोटच्या मुलीला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न करणार्‍या बापाच्या हातात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलत होती. हे पाहून तिचे वडील संतापले आणि तिच्यावर केरोसिन टाकून तिला पेटवून दिले. जळत असलेल्या अवस्थेत पीडित मुलगी मदतीसाठी घराबाहेर धावत सुटली. अखेर शेजारच्या लोकांनी तिच्या अंगावर पाणी टाकले. पीडित मुलगी 70 टक्के भाजली आहे. हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरु असून जीवन-मृत्यू असा तिचा संघर्ष सुरु आहे. सोमवारी (ता.31) मुंबईपासून जवळच असलेल्या विरारमध्ये ही घटना घडली.
ऐकूनही न ऐकल्यासारखे केलेल्या संतापला होता बाप..

- 16 वर्षीय शाइस्ता अन्सारी ही सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तिच्या मित्राशी फोनवर बोलत होती. तितक्यात तिचे वडील मोहम्मद मुर्तजा अन्सारी तिच्या रुममध्ये आले.
- मुर्तजा यांनी तिला फोन कट करण्यास सांगितले. परंतु शाइस्ता हिने ऐकूनही न ऐकल्यासारखे केले. ती फोनवर बोलतच राहिली. मुलीचे अफेअर सुरु असल्याचा मुर्तजा याला संशय आला.
- त्याने शाइस्ताच्या हातातीलळ मोबाईल हिसकावून घेतला. त्याने मुलीला मारहाण केली. कोणाशी बोलत होती, असा जाब तिला विचारला. यादरम्यान, शाइस्ताच्या बचावासाठी आलेल्या आईला मुर्तजा याने धक्का दिला.

फरफटत किचनमध्ये नेले, अंगावर के‍रोसिन टाकून पेटवले..
- मुर्तजा चांगलाच संतापला होता. त्याने शाइस्ता हिता फरफटत किचनमध्ये नेले. तिच्या अंगावर केरोसिन टाकून तिला पेटवून दिले.

- पीडितेच्या आईने सांगितले की, मुलगी किचनमध्ये जळत होती. तरी देखील तिच्या बापाला दया आल‍ी नाही. तो पाहातच राहिला. जळत असताना पीडिता घराबाहेर धावत सुटली. तेव्हा शेजारच्या लोकांनी तिच्या अंगावर पाणी टाकून आग विझविली.

पीडितेची प्रकृती चिंताजनक..
- पीडिता 70 टक्के भाजली आहे. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. केईएम हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरु असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
Minor daughter sets ablaze by father in Virar Mumbai for talking on phone

Post a Comment

 
Top