आगामी निवडणुकांसाठी युती व्हावी, अशी दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांचीही भावना आहे.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा दावा
मुंबई : शिवसेना-भाजप युती इतकी भक्कम आहे की, सौम्यच काय, तीव्र धक्के बसले तरी काही फरक पडणार नाही. काही तडे गेले असले तरी तेही लवकरच भरून निघतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही युती व्हावी अशीच इच्छा असून ‘युती होणार नाही’ असे सांगणारे संजय राऊत उघडे पडतील, असा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केला.
आगामी निवडणुकांसाठी युती व्हावी, अशी दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांचीही भावना आहे. मात्र युतीबाबत दोन्ही पक्षांच्या काही अटी असून त्यावर लवकरच एकमत होईल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप यांच्यात युती होणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. एकीकडे शिवसेना स्वबळाची भाषा करीत असतानाच भाजपनेते मात्र युती होणार असल्याचा दावा करीत आहेत.
राज्यात युती भक्कम असून कोणत्याही भूकंपाने त्यात फरक पडणार नाही. युतीबाबत अन्य पक्षांप्रमाणे आम्हाला पाच वर्षांनंतर बैठका घ्याव्या लागत नाहीत. शिवसेना-भाजपच्या बैठका रोजच होत असतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही युती व्हावी अशीच भावना असून पक्षप्रमुख असल्यामुळे त्यांना तशी उघड भूमिका घेता येत नाही. युतीबाबत दोन्ही पक्षांच्या काही अटी असून त्याबाबत चर्चा सुरू आहेत. लवकरच त्यावर एकमत होऊन युतीची घोषणा होईल, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत युती होणार नसल्याचे सांगत असल्याबद्दल विचारता, संजय राऊतांचे म्हणणे तुम्ही छापत बसा, ते चूक होते हे नंतर तुम्हाला कळेलच, असेही पाटील म्हणाले.
भाजप-शिवसेना युती झाली नाही तरी भाजपचे नुकसान होणार नाही. केंद्रात भाजपचीच सत्ता येणार असल्याने इतरांचेच नुकसान होईल. त्याहीपेक्षा काँग्रेस सत्तेवर आल्यास राज्यातील जनतेचे नुकसान होईल. ते टाळण्यासाठीच शिवसेना-भाजप युती महत्त्वाची असून त्यावर लवकच शिक्कामोर्तब होईल असा दावाही त्यांनी केला.

Post a Comment