0
बंगळूर :

कर्नाटकमध्ये राजकीय घडामोडी वेगाने सुरू असल्याने राजकीय अस्थिरता वाढली आहे. भाजपने आपल्या १०४ आमदारांना हरियाणातील रिसॉर्टमध्ये ठेवले असतानाच मंगळवारी २ अपक्ष आमदारांनी  राज्यातील काँग्रेस-निजद सरकारचा पाठिंबा काढून घेतला. यामुळे एच. डी. कुमारस्वामी यांचे सरकार धोक्यात आले आहे.ए. नागेश आणि आर. शंकर या दोन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला असून यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. दरम्यान, राज्यातील सरकार स्थिर असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. राज्यातील सरकार पाच वर्षे कालावधी पूर्ण करेल, असा दावा कर्नाटक सरकारमधील मंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला आहे.

हरियाणातील एका हॉटेलमध्ये बी. एस. येडियुराप्पा आणि इतर भाजप नेत्यांचा मुक्काम आहे...
सरकार पाडण्याची भाजपची रणनिती...

कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकातील काँग्रेस-निजद आघाडी सरकार पाडायचेच, अशी रणनिती भाजपकडून अवलंबिली जात आहे. त्यासाठी भाजपकडून तीव्र हालचाली सुरू आहेत. यामुळे राज्यातील काँग्रेस-निजदची तगमग वाढली असून यामुळे राजकीय अस्थिरता वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

वाचा : कर्नाटक : काँग्रेस-निजद सरकारची वाढली तगमग!

मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी गुप्‍तचर खात्याशी नियमित संपर्कात आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ९ आमदार बंडखोरीच्या तयारीत आहेत. आमदार रमेश जारकीहोळी यांनी बी. सी. पाटील, भीमा नायक, डॉ. सुधाकर, डी. एस. हुलगेरी, बसवनगौडा दड्डल, कंपली गणेश, बी. के. संगमेश, व्ही. मुनीयप्पा, सुब्बा रेड्डी या नाराज आमदारांशी संपर्क साधून राजीनामा देण्यासाठी मन वळविण्याचा प्रयत्न करत आहेत.

रकार पाडण्याचे भाजपचे कारस्थान : कुमारस्वामी

दरम्यान, मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी भाजपवर आमदारांची खरेदी करून काँग्रेस-निजद सरकार पाडण्याचे कारस्थान रचल्याचा आरोप केला आहे. भाजपने आपले आमदार हरियाणातील एका हॉटेलमध्ये ठेवले असतानाच काँग्रेसनेही आपले ४-५ आमदार मुंबईत ठेवले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

Post a Comment

 
Top