जळगाव :
भारतात सामानाची वाहतूक करण्यासाठी 1913 साली नॅकन्स अॅण्ड नॅकन्स या कंपनीने मेळघाटातील अचलपूर ते यवतमाळसाठी रेल्वे सुरू केली. ही नॅरो गेजवर चालणारी रेल्वे गाडी आजही सुरू आहे. मात्र बुधवार दि २३ रोजी रात्री ही गाडी यवतमाळ येथे चार्जिंग होत असतांना अचानक यवतमाळ स्थानकावर गार्डच्या असलेल्या बोगीला आग लागली. या आगीत ही बोगी जळाली. या घटनेमुळे जवळपास 25 लाखांचे नुकसान झाले आहे. आजही या रेल्वेच्या दुरूस्ती आणि देखभालीचा खर्च नेकन्स अॅण्ड नेकन्स कंपनी करते.
नेकन्स अॅण्ड नेकन्स या कंपनीने सुरू केलेली रेल्वे आजही नॉरो गेजवर धावत आहे. पूर्वी ही गाडी मेळघाटातील अचलपूर ते यवतमाळ असा 180 किमीचा प्रवास करित असे, मात्र आज गाडी क्रमांक 52137 अचलपूर-मुर्तिजापूर धावणारी शकुंतला एक्सप्रेस 76 किमी चा प्रवास दररोज करित असते. दिवसाच्या दोन फेर्या करून बुधवारी 23 जानेवारी च्या रात्री मुर्तिजापूर रेल्वे स्थानकावर उभी होती. रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास चार्जिग होत असतांना गार्डची बोगी (क्रमांक 915 जीएसआर) असलेल्या बोगील अचानक आग लागली. पाहता - पाहता आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे गाडीला असलेले तीन डबे वेगळे करण्यात आले. त्यामुळे अधिक नुकसान टळले.
गार्ड बोगीदील बॅटरी चार्जिग दरम्यान शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचे प्रथमदर्शीनी समोर आले आहे. नागरिकांनी गाडीच्या ज्या डब्याला आग लागली होती त्या डब्यापासून पुढील दोन डबे व मागील एक डब्याची कपलीग काढून टाकल्यामुळे मोठा अनर्थ व होणारे मोठे नुकसान टळले. या आगीत एक बोगी जळल्याने जवळपास 25 लाखाचे नुकसान झाले आहे. या आगीमुळे बुधवारच्या सर्व फेर्या रद्द करण्यात आल्या.

Post a Comment