0
समर्थ ज्वेलर्स तसेच अशोका रेडीमेडमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे मशीन डीव्हीआर चोरट्यांनी लांबवले.

यावल- यावलकरांना नववर्षाची पहिली रात्र वैर्‍याची ठरली. शहरातील तीन सराफा दुकाने व एक कापड दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी 38 हजारांची रोकडे व किमती साहित्य लांबवले आहे. घटनास्थळांची पोलिसांनी पहाटे पाहणी केली. डॉगस्कॉट व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले अाहे. या घटनेमुळे शहरात नव्या वर्षात चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान दिले आहे.

शहरातील मेन रोडावरील अशोका रेडीमेड, समर्थ ज्वेलर्स, दगडूशेठ सोनार ज्वलेर्स, आजीराव काशिदास कवडीवाले ज्वेलर्स, महाजन मेडीकल या दुकानांना मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी टार्गेट केले. चोरट्यांनी शटर उचकटून महाजन मेडीकल व कवडीवाले ज्वेलर्स यांचे दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. सराफा दुकानांमध्ये सुरक्षा म्हणून लावलेली लाकडी फडी व चॅनल गेट असल्याने चोरट्यांना आत शिरणे शक्य झाले नाही. समर्थ ज्वेलर्स तसेच अशोका रेडीमेडमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे मशीन डीव्हीआर चोरट्यांनी लांबवले. अशोका ज्वेलर्समधून 37 हजार 800 रूपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक डी. के. परदेशी, सहाय्यक पोलिस निरिक्षक सुजीत ठाकरे, सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील, संजय देवरे यांनी पहाटे घटनास्थळांची पाहाणी केली. परिसरातील नागरिकांशी विचारपूस केली. दुपारी जळगाव येथून ठसे तज्ज्ञ सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन गांर्गुडे, डॉगस्कॉट पथकासह उपनिरिक्षक शामराव सोनुले, हवालदार संदीप परदेशी दाखल झाले. चोरी झालेल्या दुकानांमधील ठशांची माहिती घेतली. डॉगच्या मदतीने चोरट्यांचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

एकाच दिवशी अनेक दुकाने फोडल्याच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. मेन रोडवरील दुकाने फोडल्याने चोरट्यांमधील पोलिसांचा वचक संपुष्ठात अाल्याचे बोलले जात आहे.
Robbery In Yawal on New Years First Day

Post a Comment

 
Top