0
सरकारने सर्वोच्च न्यायालयात डान्स बारवरील विरोध प्रखरपणे न मांडल्यामुळे सरकारची बाजू कमकुवत

नाशिक : सांस्कृतिक, आध्यात्मिक, मंत्रभुमी अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात डान्सबारला परवानगी देण्यात येऊ नये, अन्यथा त्याविराेधात आंदोलन उभारले जाईल, असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना दिले.


या निवेदनात म्हटले की, आघाडी सरकारच्या काळात १३ वर्षांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी डान्स बारवर बंदी आणली होती. मात्र युती सरकारने सर्वोच्च न्यायालयात डान्स बारवरील विरोध प्रखरपणे न मांडल्यामुळे सरकारची बाजू कमकुवत राहिली. नुकतीच न्यायालयाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा डान्सबार सुरु करण्यास परवानगी दिली अाहे. दरम्यान, डान्सबारमुळे भावी पिढी उद‌्ध्वस्त हाेण्याची भीती लक्षात घेत नाशिक शहर व जिल्ह्यात परवानगी देवू नये अशी मागणी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी केली. या प्रसंगी अॅड. चिन्मय गाढे, नीलेश सानप, डॉ. संदीप चव्हाण, संतोष भुजबळ, सागर बेदरकर, सुनील घुगे, भुषण गायकवाड, नदीम शेख, मितेश राठोड, जयभाऊ कोतवाल, रोहित जाधव, राज रंधावा, संतोष पुंड, बजरंग गोडसे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.Nationalist congress will be movement in Nashik when dance bars are started

Post a Comment

 
Top