0
80s चा एक सुपरस्टार कादर खान यांना मानत होता वडील, निधनानंतर झाला भावुक

मुंबई. कॉमेडियन कादर खान यांनी वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कनाडाच्या हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालावली. 22 अक्टोबर 1937 मध्ये काबुल येथे त्यांचा जन्म झाला होता. चित्रपटांमध्ये येण्यापुर्वी ते इंजीनियरिंगचे प्रोफेसर होते. एकदा दिलीप कुमार यांची कादर यांच्यावर नजर पडली आणि त्यांना चित्रपटाची पहिली ऑफर मिळाली. 'दाग' या चित्रपटातून त्यांनी इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. त्यांनी जवळपास 300 चित्रपटांमध्ये काम केले आणि 200 चित्रपटांचा स्क्रीन प्ले लिहिला. यासोबतच अमिताभ बच्चन यांच्या एंग्रीमॅन बनण्याचे श्रेयही त्यांना जाते. त्यांनीच 'शहंशाह'सारख्या चित्रपटाचे डायलॉग्स लिहिले होते. एका रिपोर्टनुसार, कादर खान यांनी मेहनतीने 69.8 कोटींची संपत्ती कमावली होती. कादर यांनी ही संपत्ती चित्रपटांची कमाई जाहिरातींमधून कमावली होती. 2017 मध्ये कादर खान यांची गुडघ्यांची सर्जरी झाली होती. ते जास्त वेळ चालू शकत नव्हते. कारण त्यांना चालताना पडण्याची भिती वाटायची.


कादर खान यांना वडील मानायचा गोविंदा
- कादर खानने राजेश खन्नापासून दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चनपासून जितेंद्र, अनिल कपूरसोबत खुप काम केले. अॅक्टर गोविंदासोबत स्क्रीनवर त्यांची जोडी नेहमी नंबर वन राहिली.
- 80s चा सुपरस्टार गोविंदासोबत त्यांनी अनेक शानदार कॉमेडी चित्रपट केले. यामध्ये ते कधी मालक बनले तर कधी त्याचे सासरे बनले आणि कधी वडील बनले. कादर खान यांच्या निधानाने गोविंदाला धक्का बसला आहे.
- गोविंदाने ट्विटरवर श्रध्दांजली देत लिहिले की, "कादर खान साहेब माझे फक्त उस्ताद नव्हते, तर माझ्या वडिलांच्या ठिकाणी होते. त्यांच्यासोबत प्रत्येक सुपरस्टारने काम केले आहे. संपुर्ण फिल्म इंडस्ट्री, मी आणि माझे कुटूंब त्यांच्या निधनामुळे खुप दुःखी आहे, हे मी शब्दात व्यक्त करु शकत नाही."
- गोविंदाने पुन्हा एकदा आपल्या वडिलांना गमावले आहे. एका मुलाखतीत आयुष्याविषयी गोविंदा म्हणाला होता की, "मी माझ्या कुटूंबात 11 मृत्यू पाहिले आहेत. यामध्ये एक माझ्या पहिल्या मुलीचा मृत्यू, ती चार महिन्यांची असतानाच गेली होती. ती प्रीमॅच्योर बेबी होती. मुलीसोबत मी माझे वडील, आई, दोन कजिन्स, भाऊजी आणि बहिणीचा मृत्यू पाहिला आहे."
kader khan: Comedian kader khan Property more than 50 crores earn by Films And ads

Post a Comment

 
Top