0
माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या व्याख्यानाला परवानगी नाकारल्याने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात तणाव निर्माण झाला आहे.

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या व्याख्यानाला परवानगी नाकारल्याने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात तणाव निर्माण झाला आहे. संस्थेने परवानगी नाकारल्यावरही व्याख्यान घेण्यावर विद्यार्थी ठाम राहिल्याने महाविद्यालयात कडोकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच साध्या वेशातही पोलीस आहेत.


दरम्यान, बी. जी. कोळसे पाटील महाविद्यालयात दाखल झाले असून विद्यार्थ्यांच्या दोन्ही गटांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ गोंधळाची स्थिती झाली होती. विद्यार्थ्यांच्या एका गटाच्या कोळसे पाटील मुर्दाबादच्या घोषणा दिल्या तर त्यांना प्रत्यूत्तर म्हणून दुसऱ्या गटाच्या कोळसे पाटील समर्थनार्थ घोषणा दिल्या. 


यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. यामुळे दोन्ही गट आमनेसामने येण्यापासून रोखण्यात आले. 
आज बी.जे.कोळसे पाटील यांचे व्याख्यान दुपारी 12 वाजता फर्ग्युसन महाविद्यालयातील अँफी थिएटर मध्ये आयोजित करण्यात होते. कोळसे पाटील भारतीय राज्यघटना या विषयावर व्याख्यान देणार होते. परंतु शनिवारी अचानक या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने विद्यार्थी संघटना आता आक्रमक झाल्या आहेत.Former Justice B. G. Kolhas Patil reached to Fergusson; students proclaiming | माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचे फर्ग्युसनच्या आवारातच भाषण

Post a Comment

 
Top