0
जास्तीत जास्त लोक आता आपल्या फिटनेसबाबत जागरूक राहू लागले आहेत. त्यामुळे फिटनेस लोकांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे.

जास्तीत जास्त लोक आता आपल्या फिटनेसबाबत जागरूक राहू लागले आहेत. त्यामुळे फिटनेस लोकांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. फिट राहण्यासाठी आणि दिसण्यासाठी लोक भरपूर एक्सरसाइज करतात. पण एक्सरसाइज करण्यापूर्वी तुम्हाला हे माहीत असायला हवे की, कोणती एक्सरसाइज फायद्याची आहे आणि कोणत्या प्रकारची एक्सरसाइज तुमच्यासाठी नुकसानकारक आहे. 
काही वर्षांपूर्वी फिट राहण्यासाठी सिट-अप एक्सरसाइज सर्वात चांगली मानली जात होती. कारण या एक्सरसाइजने मांसपेशींवर दबाव देऊन शरीर वरच्या बाजूने ओढलं जातं. त्यामुळे मांसपेशी मजबूत होतात. पण आता एका रिसर्चनुसार, सिट अप एक्सरसाइज करून काही लोकांना गंभीर जखम किंवा इजा होण्याचा धोका अधिक असतो.
काय सांगतो रिसर्च?
एका रिसर्चनुसार, सिट अप एक्सरसाइज केल्याने ५६ टक्के सैनिकांना गंभीर इजा झाली. या रिसर्चनंतरच २०१५ मध्ये यूएस आर्मीने त्यांच्या ट्रेनिंग रूटीनमधून सिट अप एक्सरसाइजवर बंदी आणली होती. त्यासोबतच यूएसमधील 'द नेव्ही टाइम्स' हे मॅगझिन सिट अप एक्सरसाइजवर पूर्णपणे बॅन करण्याची मागणी करत आहे.
काय होतो धोका?
कॅनडातील यूनिव्हर्सिटी ऑफ वाटरलूमध्ये स्पाइन बायोमेकॅनिक्सचे प्राध्यापक स्टुअर्ट मॅकगिल यांनी त्यांच्या अभ्यासाच्या आधारावर सांगितले की, तासंतास सिट अप केल्याने स्लिप डिस्क आणि कंबरदुखीचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे ही एक्सरसाइज न करण्यावर भर दिला जात आहे. पण आजही तरूण मंडळी ही एक्सरसाइज वजन कमी करण्याच्या उद्देशाने करताना दिसते. 
यूएसमध्ये २०११ मध्ये झालेल्या एका ट्रायलमध्ये काही लोकांना दोन गटात विभागण्यात आले. यातील एका ग्रुपने रोज सिट अप एक्सरसाइज केली. तर दुसऱ्या ग्रुपने कोणतीही एक्सरसाइज केली नाही. यातून हे समोर आलं की, ६ आठवडे रोज सिट अप एक्सरसाइज केल्यानंतर सुद्धा लोकांच्या पोटावरील चरबी आणि त्यांचा जाडेपणा कमी झाला नाही. 

लोकांमध्ये गैरसमज...

या अभ्यासात सांगण्यात आलं आहे की, अनेक लोकांना असं वाटतं की, जास्त सिट अप करून पोटाची चरबी लवकर कमी होते. पण असं अजिबात नाहीये. कारण शरीर वेगवेगळ्या प्रकारे काम करतं. केवळ एक्सरसाइज करून वजन कमी होत नाही. तर वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइजसोबतच योग्य डाएटही फॉलो करणे गरजचं आहे. 
सिट अपने काय होतं?
सिट अप या एक्सरसाइजमुळे केवळ त्याच मांसपेशी सक्रिय होतात, ज्या सिक्स पॅकसाठी कारणीभूत असतात. पण जर या मांसपेशी फार जास्त मजबूत झाल्या तर त्या पोटाच्या वर आलेल्या दिसतात. ज्यामुळे पोटात चरबी कमी होण्याऐवजी एक पॉट म्हणजे फुगीर भार बाहेरच्या दिशेने निघतो. 
अनेक अभ्यासांमधून सांगण्यात आलं आहे की, फिट राहण्यासाठी सर्वात चांगली एक्सरसाइज म्हणजे प्लॅंक आहे. प्लॅंक या एक्सरसाइजमुळे पुढील भाग, मागचा भाग आणि दोन्ही बाजूंच्या मांसपेशींवर प्रेशर पडतं. त्यामुळे हे प्रेशर बॅलन्स होतं. पण सिट अपमध्ये केवळ पोटाच्या मांसपेशींवर प्रेशर पडतं. 

Post a comment

 
Top