मुंबई :
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी भाजप-शिवसेना युतीच्या गोठलेल्या चर्चेची कोंडी अखेर फुटली. विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुकांसाठी एकत्र जागावाटप करा अशी अट शिवसेनेने टाकल्याचे कळते. तर लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्ता परिवर्तन झाले तर विधानसभेत सोबत राहण्याची हमी भाजपने शिवसेनेकडे मागितल्याचे समजते.
येत्या दोन दिवसांत भाजप - सेना युतीच्या चर्चेला सुरुवात होऊ शकते, अशी शक्यता खात्रीशीर सूत्रांनी वर्तवली आहे. 28 जानेवारीला भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीआधी ही चर्चा व्हावी अशी सेनेची मागणी आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जरी एकत्र झाल्या नाही तरी जागावाटप सोबतच व्हावे यावर शिवसेना ठाम आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून वाजत-गाजत असलेली शिवसेना आणि भाजप यांची युती होणार की नाही, यावरील प्रश्नचिन्ह अजूनही कायम असले, तरी भाजपाने अजुनही आशा सोडलेली नाही. बुधवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त झालेल्या कार्यक्रमास हजेरी लावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकाच्या निधीसंदर्भातील कागदपत्रे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या स्वाधीन केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघेही महापौर बंगल्यात एकत्र गेले, यावेळी शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांना बाहेरच थांबवण्यात आले होते. या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड नेमके काय झाले, याची चर्चा नंतर माध्यमांमध्ये रंगली होती. मात्र युतीसंदर्भात यावेळी प्रसारमाध्यमांशी काहीही बोलण्याचे दोन्ही नेत्यांनी टाळले.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाला शिवसेनेशी युती असणे गरजेचे वाटत असून विधानसभा आणि लोकसभा अशा दोन्ही निवडणुकांत युती असावी, असा मतप्रवाह शिवसेनेच्या नेत्यांमध्येही आहे. सेनेच्या अनेक खासदारांनी ही भावना आपल्या पक्षप्रमुखांकडे बोलून दाखवल्याची चर्चा आहे. मात्र स्वतः उध्दव ठाकरे यांनी यावर काहीही जाहीर मतप्रदर्शन केलेले नाही.

Post a Comment