0
कराड :

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित मलकापूर (तालुका कराड जिल्हा सातारा) नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. पहिल्या पाच प्रभागांच्या मतमोजणीत भाजप तीन जागांवर विजय मिळवला आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला सहा जागांवर समाधान मानावे लागले आहे. याशिवाय भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ही सुमारे तीनशे मताने आघाडीवर आहेत.

पहिल्या पाच प्रभागात प्रभाग एकमध्ये काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर प्रभाग दोनमध्ये काँग्रेसचे उमेदवार माजी नगराध्यक्ष मोहनराव शिंगाडे यांच्यासह त्यांच्या सहकारी उमेदवार यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या प्रभागात भाजपचा उमेदवार माजी नगराध्यक्ष नूरजँहा मुल्ला यांच्यासह भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.

प्रभाग तीनमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली असून प्रभाग चार आणि पाचमध्ये  दोन्ही पक्षांच्या महिला उमेदवार यांना समान मते मिळाली आहेत. त्यामुळे हा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. तर प्रभाग पाचमधील दोन्ही पक्षांचे प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले आहेत. पहिल्या पाच प्रभागात भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर सारिका गावडे यांनी काँग्रेस उमेदवारावर ३७६ मतांची आघाडी घेतली आहे.

Post a comment

 
Top