0
दाक्षिणात्‍य चित्रपट पेटा १० जानेवारीला रिलीज झाला.पेटा चित्रपटात जबरदस्‍त ॲक्‍शन ड्रामा पाहायला मिळाला. तर चित्रपट 'विश्‍वासम'देखील प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरला आहे. अक्षयकुमार आणि रजनीकांत यांचा २०१८ मध्‍ये आलेल्‍या २.० चित्रपटाने ८०० कोटींचा गल्‍ला जमवला होता. या चित्रपटानंतर आता रजनी यांच्‍या फॅन्‍ससाठी पेटा चित्रपट रिलीज झाला.कार्तिक सुब्‍बराज यांनी पेटा चित्रपटाचे दिग्‍दर्शन केले आहे. पेटाचा अर्थ आहे, भाग क्षेत्र.
रजनीकांत यांच्‍या पेटा या चित्रपटाने १६ कोटींची कमाई केली आहे. पेटा तामिळनाडूमध्‍ये जवळपास ५०० हून अधिक स्‍क्रीन्‍सवर रिलीज करण्‍यात आली होती. तर चेन्‍नईमध्‍ये या चित्रपटाने १.१२ कोटी रुपये कमावले आहेत. विश्‍वासमने चेन्‍नईमध्‍ये ८८ लाख रुपयांची कमाई केली आहे. केरळमध्‍ये पेटाने १.४५ कोटी रुपयांचा गल्‍ला जमवला आहे. तर विश्‍वासमने ९२ लाख रुपयांची कमाई केली.रजनीकांत यांचा पेटा विश्‍वासमवर भारी पडत आहे. 

नुकताच,विक्‍की कौशल यांच्‍या 'उरी' या चित्रपटाचा आणि अनुपम खेर यांचा 'द ॲक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्‍टर' ११ जानेवारीला रिलीज झाला आहे.या दोन्‍ही चित्रपटांची उत्‍सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती.काही जाणकारांच्‍या मते,या दोन्‍ही चित्रपटांमुळे 'पेटा' आणि 'विश्‍वासम'च्‍या कलेक्‍शनवर परिणाम होणार आहे.परंतु,काही ट्रेड ॲनालिस्‍टच्‍या माहितीनुसार,बॉलिवूड चित्रपटांमुळे दाक्षिणात्‍य हिंदी व्‍हर्जनच्‍या चित्रपटांच्‍या कलेक्‍शनवर कुठलाही परिणाम होणार नाही.

Post a Comment

Top