0
गुजरात (अहमदाबार ) :

भाजपचे माजी आमदार जयंतीलाल भानुशाली यांची कटरिया-सुरबरी रेल्‍वे स्‍थानकादरम्‍यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सयाची नगरी एक्स्प्रेस या धावत्‍या रेल्‍वेतच अज्ञातांकडून भानुशाली यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्‍याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली.

जयंतीलाल भानुशाली हे सयाची नगरी एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. त्यावेळी कटारिया-सुरबरी रेल्वे स्थानकादरम्यान काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळ्या त्‍यांच्या छातीत घुसल्‍याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, याप्रकरणी तपास करत आहेत. 

जयंतीलाल हे गुजरात भाजपचे उपाध्यक्ष होते. परंतु, गेल्यावर्षी सुरतमधील एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना फॅशन डिझाइनमध्ये प्रवेश देण्यासाठी अश्लील व्हिडिओ क्लिप बनवत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना भाजपच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. माझा प्रतिमा मलीन करण्यासाठी माझ्यावर असा आरोप करण्यात आला होता. आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपाला कुठलाही आधार नाही  असे त्‍यांनी त्‍यावेळी म्‍हटले होते.

Post a Comment

 
Top