कराड :
सातारा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार? हे गुलदस्त्यात असतानाच राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विकासाच्या मुद्यावरून जोरदार टीका करत घरचा आहेर दिला. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या महाराष्ट्र दौलत या शताब्दी स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

खासदार उदयनराजे यांनी मुख्यमंत्री तसेच युतीच्या मंत्री, आमदारांच्या उपस्थितीत शासनावर स्तुतीसुमने उधळली. युती सरकारच्या अनेक निर्णयाचे कौतुक करत आघाडी सरकारमधील मागील १५ वर्षात केवळ घोषणाच झाल्या, मात्र याची अंमलबजावणी झाली नसल्याची टीका खासदार उदयनराजे यांनी केली.
याकार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री, शिवसेना - भाजपाचे पश्चिम महाराष्ट्रातील आमदार यावेळी उपस्थित होते.

Post a Comment