0
भीमा कोरेगाव प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. पण त्यांच्यावर अजूनही आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं नाही.

नवी दिल्ली, 10 जानेवारी : भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. आरोपींविरुद्ध 90 दिवसांनतरही आरोपपत्र दाखल न केल्यामुळे त्यांना जामीन मिळावा, अशी विनंती त्यांच्या वकिलांकडून कोर्टात करण्यात येणार.

भीमा कोरेगाव प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. पण त्यांच्यावर अजूनही आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं नाही. आरोपपत्र दाखल होत नसतानाही त्यांना अटक का? त्यामुळे त्यांना जामीन मिळावा, अशी मागणी करत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल.

काय आहे भीमा कोरेगाव प्रकरण?

भीमा कोरेगावच्या वर्षभरापूर्वीच्या घटनेने महाराष्ट्राचच नव्हे तर देशाचं वातावरण ढवळून निघालं. सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न समाकंटकांनी केला. राजकीय आरोप प्रत्यारोप झाले आणि प्रत्येकजण आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. या राजकीय साठमारीत समाजाची विण उसवली गेली. या वर्षाच्या सुरवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात सुरू झालेल्या या क्रिया-प्रतिक्रिया अजूनही थांबायला तयार नाहीत. 1 जानेवारी 2019 रोजी भीमा-कोरेगावची लढाई म्हणून इतिसाहास प्रसिद्ध असलेल्या या लढाईतल्या विजयाला 201 वर्ष पूर्ण झाली.भीमा कोरेगाव : सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, आरोपींना जामीन मिळणार?

Post a comment

 
Top