इगतपुरी शहरातील बाफना ऑइल मिलला गुरूवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत ऑइल मिल संपूर्ण जळुन खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही आग शॉट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी नवाबाजार पेठेत जुनी बाफना ही ऑइल मिल होती. या मिलला गुरूवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीचे काही वेळात मोठे तांडव झाले होते. नागरिकांनी मालक बाफना यांना या घटनेची तात्काळ दिली. तर नागरिकांनी या घटनेबाबत इगतपुरी नगरपरिषद व अग्निशमन दलाला माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे प्रयत्न केले. अथक प्रयत्नानंतर दोन तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले. मात्र या भीषण आगीत बाफना ऑइल मिलमध्ये संपूर्ण सामान जळुन खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.
Post a Comment