0
खामगांव- स्थानिक बर्डे प्लॉट येथील भव्य मैदानावर १८ जानेवारी, तबलिगी दिनापासून भव्य इस्तेमा आयोजित करण्यात आला आहे. याठिकाणी आमदार  आकाश फुंडकर यांनी मुस्लीम समाज बांधवांसोबत २१ जानेवारी रोजी सामुहिक प्रार्थना केली.

बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती या पाच जिल्हयामधून हजारो मुस्लीम बाधव या कार्यक्रमासाठी सहभागी झाले होते. २१ जानेवारी रोजी आयोजीत सामुहिक प्रार्थनेने या इस्तेमाचा समारोप झाला. दिल्ली येथील मुख्य मौलवी अस्लम साहद साहब यांनी सामुहिक प्रार्थना (बडी दुवा) पठण केली. या कार्यक्रमात आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी सहभाग घेऊन मुस्लीम समाज बांधवांना शुभेच्छा देत जगाच्या शांतीसाठी, नागरीकांच्या कल्याणासाठी सामुहिक प्रार्थना केली. यावेळी त्यांचेसोबत वैभव डवरे माजी नगराध्यक्ष दर्शनसिंह ठाकुर, कृष्णा ठाकूर, अनिस जमादार, राजा फईम, शोहरतभाई, गुलजम्मा शाह आदी मस्लीम बांधव सहभागी होते.  यावेळी या भव्य इस्तेमा साठी प्रशासनाकडून सर्व सहकार्य मिळवून दिल्याबददल आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांचे मुस्लीम समाज बांधवांनी आभार मानले.

Akash Fundkar made prayer with Muslim brothers | आकाश फुंडकर यांनी केली मुस्लीम बांधवांसोबत ‘बडी दुवा’

Post a Comment

Top