0
मुंबई :

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर अद्याप तोडगा निघाला नसल्याने बुधवारी (दि.१६) सलग नवव्या दिवशी संप सुरूच आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड गैरसोय होत आहे.


गेल्या ८ जानेवारीपासून ३२ हजार बेस्ट कामगार संपावर गेले आहेत. बेस्टच्या ३७०० बसेस जागीच उभ्या आहेत. दरम्यान, बेस्ट कामगारांच्या प्रश्‍नांवर स्थापन झालेल्या उच्च स्तरीय समितीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी स्वीकारला आणि आता संप मागे घेण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी बेस्ट कामगारांच्या संघटनांना बुधवारपर्यंतची मुदत दिली आहे. मात्र, बेस्ट संप मिटण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत.

वाचा : बेस्टच्या संपाचा आज फैसला?
आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही, अशी भूमिका बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. बेस्ट कर्मचार्‍यांचा संप मिटण्याऐवजी आणखीनच चिघळत जात असल्याने कर्मचाऱ्यांमधील असंतोष वाढला आहे. त्यात डिसेंबरचा पगार थकल्याने कर्मचार्‍यांच्या कुटुंबावर संक्रांत आली आहे. परिस्थिती बिकट असली तरी संपात उतरलेल्या कर्मचार्‍यांनी मागण्या मान्य होईपर्यंत संपातून माघार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संपाची धार तीव्र झाली आहे.

Post a Comment

 
Top