0
सिडनी कसोटीत भारताने दुसऱ्या दिवशी लंचपर्यंत ३८९ धावांपर्यंत मजल मारली. भारताने पहिल्या दिवशीच्या ४ बाद ३०३ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरुवात पुजारा आणि विहारीने चांगली केली. पण, संघाच्या कालच्या धावसंख्येत २६ धावांची भर घातल्यानंतर पाचव्या विकेटसाठी शतकी भागिदारी करणारी ही जोडी फुटली. विहारीचा लायनला स्विप मारण्याचा प्रयत्न फसला आणि तो ४२ धावांवर शॉर्ट लेगकडे झेल देऊन परतला. त्यानंतर आलेल्या पंतने दिडशतक करणाऱ्या पुजाराच्या साथीने भारताची धावसंख्या वाढवण्यास सुरु केले. लंचपर्यंत भारत ४०० धावांच्या जवळ पोहचला होता. तर पुजारा आपल्या द्विशतकाच्या जवळ पोहचला. 

Post a Comment

 
Top