0
खंडाळा :
खंडाळा, पुरंदर तालुक्यातील पाच शेतकर्‍यांना दीड वर्षात दुप्पट रक्‍कम करून देतो, असे सांगत सुमारे 1 कोटी 29 लाख 50 हजार रुपयांना गंडा घातल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शेतकर्‍यांना गंडा घालणार्‍या भामट्या धामणकर दाम्पत्यावर खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.


खंडाळा तालुक्यातील केसुर्डी येथील काही शेतकरी व पुरंदर तालुक्यातील परिचे येथील तीन अशा एकूण पाच शेतकर्‍यांची 2016 मध्ये एम.आय.डी.सी ला जमीन संपादित करण्यात आली होती. त्या संपादित जमिनीच्या मोबदल्यात रकमा शेतकर्‍यांच्या नावे जमा झाल्या होत्या. येथील वैभव धामणकर व त्यांची पत्नी निलम धामणकर यांनी संबधीत शेतकर्‍यांशी जवळीक निर्माण करुन मिळालेली रक्कम तुम्ही आमच्याकडे गुंतवा तुम्हाला आम्ही चांगला फायदा करून देतो. व त्या डबल रक्कमेचा चेक तुम्हाला देवू किंवा तुमच्या अकांऊटवर दिड वर्षाने ट्रान्सफर करू, असे सांगून शेतकर्‍यांचा विश्‍वास संपादन केला होता. 1 कोटी 29 लाख 50 हजार एवढी रक्कम धनादेशाद्वारे स्विकारली होती. दिड वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेतकर्‍यांनी रक्कमेची मागणी केली. मात्र, धामणकर दाम्पत्याने ती देण्यास टाळाटाळ केली. शेतकर्‍यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत धामणकर यांच्या विरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिक्षक अभिजित पाटील करत आहेत.

संपर्क साधा

ज्या नागरिकांची वैभव धामणकर व त्याची पत्नी नीलम धामणकर यांनी फसवणूक केली असल्यास खंडाळा पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी केले आहे.

Post a Comment

 
Top