0
मॉस्को : 

रशियाजवळील कर्चच्या समुद्रात दोन तेलवाहू जहाजांना लागलेल्‍या भीषण आगीत १४ खलाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर ९ जण बेपत्ता आहेत. रशियन पाणबुडे त्यांचा शोध घेत आहेत. आग लागलेल्‍या दोन्ही जहाजांवर १५ भारतीय खलाशी असल्‍याची माहिती समोर आली आहे.

आग लागलेली दोन्ही जहाजे टांझानिया देशाच्या मालकीची आहेत. यातील एका जहाजात‘लिक्वीफाइड नॅचरल गॅस’ (एलएनजी) होता तर दुसऱ्यामध्ये टँकर्स होते. यातील एका जहाजातून मालवाहू टाकीमध्ये गॅस भरत असताना उचानक मोठा स्फोट झाला. काही क्षणात दोन्ही जहाजांना भीषण आग लागली. यावेळी ३५ खलाशांनी समुद्रात उडी घेतली. यापैकी १२ जणांना वाचविण्यात आले आहे. तर ९ जण अद्याप बेपत्ता आहेत.

रशियाच्या स्‍थानिक माध्यमांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आग लागलेल्‍या एका जहाजावर १७ खलाशी होते, त्‍यातील ९ तुर्कस्तानचे आणि ८ खलाशी भारतीय होते.  दुसऱ्या जहाजावर १५ खलाशी होते. यामध्ये तुर्कस्तानचे ७ आणि भारताचे ७ खलाशी होते.

Post a Comment

 
Top