0
ऑस्‍टेलिया दौऱ्यावर असलेल्‍या टीम इंडियाने आणखी एक विक्रम केला आहे. टीम इडियाने तब्‍बत ३१ वर्षानंतर हा विक्राम आपल्‍या नावावर करुन ऑस्‍ट्रेलियन संघावर नामुष्‍की आणली आहे.  भारताने ऑस्ट्रेलियाला रविवारी फॉलोऑन दिला. यापूर्वी ऑस्ट्रेलियाला आपल्या घरच्या मैदानात २९ जानेवारी १९८८ रोजी इंग्‍लंडने फॉलोऑन दिला होता. या आधी भारताने १९८६ साली अशी कामगिरी केली होती.

सिडनी कसोटीवर भारतीय संघाने पूर्णपणे वर्चस्व मिळवले आहे. कुलदीप यादवने घेतलेल्‍या पाच बळींच्या जोरावर कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर गुंडाळला. पहिल्या डावात ३२२ धावांची आघाडी घेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला फॉलोऑन खेळण्यास भाग पाडले आहे.

जबरदस्‍त फॉर्ममध्ये असलेल्‍या टीम इंडियाने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने जिंकून २-१ अशी आघाडी घेतली आहे. ही मालिका भारताने जळपास खिशात घातली आहे. सिडनी येथे सुरु असलेल्‍या चौथ्‍या आणि अखेरच्या कसोटीवरही भारताने मजबुत पकड निर्माण केली आहे. मात्र, पावसाच्या व्यत्‍ययामुळे रविवारी चौथ्‍या दिवसाचा खेळ थांबवावा आगला.

तत्‍पूवी भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ गड्यांच्या मोबदल्‍यात ऑस्‍ट्रेलियासमोर ६२२ धावांचा  डोंगर उभा केला आहे. या धावांचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रलियाला पहिल्‍या डावात ३०० धावांतच गुंडाळले. 

Post a comment

 
Top